Ticker

6/recent/ticker-posts

प्रेम म्हणजे विश्वासघात - आणि बरेच काही

प्रेम किती मस्त असतें ना प्रेम , ज्याच्याकडे असते त्याला किंमत नसते व ज्याला किंमत असते त्याच्या कडे प्रेम नसते.
             मित्रांनो नसतेच खरे प्रेम कधी आयुष्यासाठी . ते फक्त दिवसांसाठी असू शकते, नाहीतर काही काळासाठी. आजकाल एकाच माणसांसोबत आयुष्य काढायचे म्हणजे आवघडच. कारण मन कधी बदलेल सांगता येत नाही. विश्वास कधी तुटला जाईल सांगता येत नाही. वाटले होते प्रेमात नसते शरीराची गरज पण आजकाल आत्मा देखील राहिलाच नाही कुठे. 
             एखाद्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे म्हणजे खूप मोठे पाप आहे. कारण कधी विश्वासघात होईल सांगता येत नाही. जिथे विश्वास तुटला जातो तिथे कशाचे आले प्रेम. बोलण्यासाठी ही जिथे वेळ नसेल , उरलेल्या वेळेत बोलणे हेच फक्त प्रेम असेल. म्हणजे काय अर्थ त्या प्रेमाचा. जिथे काहीवेळ लांब राहिले तर प्रेम संपून जाते. मंग असतात नवीन लोक व नवीन प्रेम तेही अगदी थोड्या दिवसातच. का ठेवला जातो इतका विश्वास फक्त ३/४ दिवसात व का मोडला जातो ५/६ वर्षाचा विश्वास. अहो कसले आले प्रेम तिथे कारण खरे प्रेम परत होत नाही व झालेच तर आधीचे प्रेम कसे असणार खरे. 

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7032202176779908"
     crossorigin="anonymous"></script>
     <ins class="adsbygoogle"
          style="display:block; text-align:center;"
               data-ad-layout="in-article"
                    data-ad-format="fluid"
                         data-ad-client="ca-pub-7032202176779908"
                              data-ad-slot="6705697930"></ins>
                              <script>
                                   (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
                                   </script>

             आधी लग्नाचे स्वप्न दाखवायचे , विश्वास पटवून द्यायचा , नंतर इग्नोर करायचे ...तू कर आधी जॉब नंतर बघू लग्नाचे ...माझी मम्मी नाही हो म्हणणार तुझ्याकडे जॉब नसेल तर. का असे मधीच भिकारी वाटू लगतो. प्रेमात फक्त पैसा लागतो का? फक्त पैसा असेल म्हणजे प्रेम खरे व पैसा नसेल म्हणजे प्रेम खोटे. बाजार झालाय प्रेमाचा खरच.
             प्रेम म्हणजे फक्त काही दिवसांसाठी जवळीक व कायमचा दुरावा .........असे असेल तर का करून घ्यायचा त्रास आपण , का गरज फक्त एकालाच असते का ? मित्रांनो काही गरज नाही अश्या प्रेमाची आयुष्यात कारण कोणीच मरत नाही कोणी नाही भेटले म्हणून. तडफडत, त्रास होऊन , धडपडत , वेडे होऊन पण कसेतरी जगतातच हे नक्की .
             वाटले होते हातात तिचा हात सोबत तिची साथ पण तिच्या मनाला कधी सांगूच शकलो नाही किती प्रेम केले, किती विश्वास ठेवला , का हीच शिक्षा अस्तेका खरे व मनापासून प्रेम करण्याची? 
             माणूस जन्माला एकटाच येतो व मेलातरी एकटाच जातो. मग का करून घ्यायचा आयुष्भर त्रास , काय चूक केली आपण इतके प्रेम करून, सोडावे म्हंटले तर सोडता येत नाही, जवळ ही घेतले तर त्रास होतो. त्यापेक्षा लांब झालेले बरे ....तिची लाईफ होईल सेट ...मिळेल तिला चांगला साथी.
              असेल कमी आपल्यातच काहीतरी हे ही मान्य केले पाहिजे आपण. म्हणून तर आवडले असेल कोणीतरी पुन्हा . का बघत बसायची आपण वाट. 
              मित्रांनो सोडून द्यायचे की काय झाले काल व बघायचे काय होता येईल उद्या. ती असेल आपल्या शिवाय सुखी तर आपणही रहायचे सुखी , जगायचे मस्त. विश्वासघात केलेल्या लोकांसाठी का मरायचे आपण. 
              होईल त्रास पण जगायला शिकायचे परत. आपल्या आई , बाबा साठी त्यांनी दिले जन्म आपल्याला.  
              

Post a Comment

0 Comments