पुरतील तुला आणि मला जाळतील एकाच मातीत,
तरी का अडकून पडलाय तू या वेग वेगळ्या जातीत,
तुझा देव महान तुझ्या साठी, आणि माझा का लहान आहे,
तुझी माझी तहान भागवते एकच पाणी आणि मंग् तुला का वेगळी तहान आहे,
तूही संपणार इथे आणि मी तरी कुठे उरणार आहे,
ती तुझी जात आणि ही जात माझी अरे अश्याने माणुसकी कुठे पुरणार आहे,
असेल रक्त लाल तुझे आणि माझ्या रक्तात कुठे डाग आहे,
तुझ्या जातीचा अभिमान तुला, आणि माझ्या जातीचा का राग आहे,
तू मिरवतो झेंडा तुझा आणि माझ्या झेंड्याचा रंग का वेगळा आहे,
ती तुझी जात आणि ही माझी जात तर आपली माणुसकीची जात कुठे आहे,
या जाती पोटी तू इथे तुझे स्वप्न विसरतो आहे,
पेटवतोय वणवा न विझवणारा आणि तुझा माझा यात मात्र अंत होत आहे.
आपलाच कृष्णा मेहेत्रे.
0 Comments