Ticker

6/recent/ticker-posts

आजचा माणूस


माणूस

“ माणूस “ आज कुठे हरवला हा माणूस, जो एक दिवस प्रत्येकाला सोबत घेऊन चालत होता, कोणी हरले – रडले तर त्याला धीर देत होता. आपल्या माणसात आपले सुख शोधत होता. आज माहित नाही तो कुठे वसवला  आहे. त्याच्या शोधात तो कुठे हरवला  आहे.

प्रत्येक चुकीला कारणे देत तो परत चुकीकडे धावत आहे. शर्यत मरेपर्यंत आहे धावण्याची, हे माहित असूनही  पण तो त्या शर्यतीत एकटाच धावत आहे, आपल्या सोबतच्या माणसांना एकटे सोडून. तो त्याच्याच दुनियेत वावरत आहे. स्वतःहा पडला कि  सावरतो तो पण इतरांना मात्र डावलत आहे. त्याचीच दुनिया त्याचेच ते जग प्रत्येकात कुठे इथे मानूस उरत आहे, “उरतोय तो फक्त दुरावा, आणि मी चुकीचा नाही हाच पुरावा.” यात प्रेम , काळजी , भावना , ओढ कुठे हरवली माहित नाही, आज सर्व काही सापडेल पण शोधून शोधून माणूस कुठेच सापडणार नाही.  सापडेल तो स्वत: हाच्या दुनियेत व्यस्त , त्याच्याच धुंदीत मस्त, पण या, बसा, बोलू, असो तो कुठे दिसणार नाही. आपल्या वाईट वेळेत आपल्याला सावरणारा तो मायेचा हात कुठे सापडणार नाही.

      तू लढ असे म्हणतील सर्व पण तू पडल्यावर तुला उठवणारे , तुला सावरणारे कुठे सापडतील...? धर्माच्या जाती होत्या ओ, पण आज माणसाच्या हि जाती निर्माण झाल्याय. आता फक्त भेटेल तुम्हाला वेगळ्या वेगळ्या जातीचा माणूस बघायला. तुमचा हक्काचा माणूस आज कुठे सापडणार नाही. तुमच्या मनाला त्रास देणारा व्यक्ती प्रत्येक पावलांवर भेटेल पण तुमचे मन समजून घेणारा व्यक्ती कुठे सापडेल....? सापडेल तो कामापुरता व गरजे पुरता  जवळ घेणारा माणूस नंतर ओळख हि न देणारा व आपल्याला आपण परके असल्याची जाणीव करून देणारा माणूस. जिवंत पणी पडणाऱ्या माणसाला कोणी लवकर उचलत नाही पण मरण पावलेल्या माणसाला चार- चार लोक असतात उचलायला. गरज नसतानी. पण एखांदा जरासानिराश झाला तर त्याला सावरायला कोणी नसते. त्याला फाशी घेण्या पासून आवरायला कोणी नसते.

            इतकीच उरलीय माणुसकी आता , नाही कुठे उरला तो माणूस.

-      कृष्णा मेहेत्रे 


Post a Comment

0 Comments