देव माणसात कि दगडात...?
दगडातला देव रोज दिव्याने प्रकाशमय केला जातो,
माणसातला देव मात्र समजून न घेता सकाळीच अंधारमय केला जातो,
दगडातला देव रोज दुधाने भिजला जातो,
माणसातला देव मात्र दोन घासासाठी विझला जातो,
दगडातला देव वारंवार पंच अमृतानी धुतला जातो,
माणसातला देव मात्र अस्वच्छ मानून संपवला जातो,
दगडातला देव भीती पोटी जपला जातो,
माणसातला देव मात्र वंश जपण्यासाठी
श्वास घेण्या आधीच कापला जातो,
दगडातला देव कामाचा म्हणून ओवळाला जातो,
माणसातला देव मात्र सकाळीच बिनकामाचा
म्हणून मावळला जातो ,
दगडातला देव दागिन्यांनी सजवला जातो,
माणसातला देव मात्र अनेक चुकांनी
मढवला जातो,
दगडातला देव आनंदात मिरवला जातो,
माणसातला देव मात्र चार भिंतीत फिरवला
जातो,
दगडातला देव रोज सकाळी पहाटे नित्य नियमांनी उठवला जातो,
माणसातला देव मात्र का माणूस मेल्यानंतरच आठवला जातो.
0 Comments