मला खूप काही नाही माझी काळी माय ओली हवी,
सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी मला माझ्या कष्टाची झोळी हवी,
मी पिकवलेले अन्न खाऊन प्रत्येकानी जगावे पण कर्जापायी फाशी घेऊन मीच का मरावे,
अजुन ऐक माय आहे माझी म्हातारी कोपऱ्यात बसलेली
हातपाय चालत नाही तरी कष्ट करणारी,
कारण म्हातारा ही कष्ट करून मेला पण माझ्या आईचा इलाज काही करूच शकला नाही
शेवटी त्याचेही प्राण कर्जबाजारी पणाच घेऊन गेला,
पोरं बाळ रडतात माझी एका अन्नाच्या घासासाठी कारण थोडेसे उरलेले दाने सुध्धा सावकार घेऊन गेला,
फार नको पण थोडासा भाव द्याना
मरताना ही दोन घास जरा माझ्या आईला खाऊ द्याना,
बायको तर देतेच मला साथ घेते हातात फावंड अन चालते बिन चपलांची वाट,
अंगावर असतात फाटलेले कपडे तरी न लाजता कष्ट करतो आम्ही,
मात्र फुकट विकत घेऊन त्या पिठावर रेषा ओढता तुम्ही,
तरी ही राबतो आम्ही रात्र अण दिवस कष्ट हेच जीवन आमचे कष्ट हेच भांडवल,
दरातील गाय सुध्धा चाऱ्यासाठी ओरडते पण तिला काय कळणार तिच्या मालकाच्या घशाला देखील कोरड पडते,
इतके कष्ट करून सुध्धा आमच्या मालाचा भाव कधी योग्य केला जात नाही,
द्यावाच लागतो कमी किंमतीत माल नाहीतर आम्हा शेतकऱ्यांना फाशी शिवाय दुसरा पर्यायच उरत नाही,
पावसाने तर फिरवली पाठ आमच्याकडे पण माणुसकी सुध्धा कुठे उरलीच नाही,
आम्ही पिकवले खातात स्वस्त पण तरीही म्हणतात शंभराची नोट पुरलीच नाही,
जरासा भाव वाढला की आंदोलने होतात
मात्र शंभर रू लिटर पेट्रोल वर यांच्या गाड्या खूप धावतात,
आहो असा भेदभाव
कधी आमच्या राजानं केला नाही
शेतकऱ्यांना एकटे सोडून स्वराज्य घडवले नाही.
आपलाच कृष्णा मेहेत्रे.
Krishmehetre.blogspot.com
0 Comments