प्रेम म्हणजे एक अस्मरणीय भेट आहे, आपल्याला देवांनी दिलेली, आणि प्रत्येकाने आपल्या स्वप्नात बघितलेली. प्रेमाची प्रेमाची गोष्ट जरा वेगळीच असते. ही भेट प्रत्येकालाच देवाकडून भेटते.
पण टिकवता जरा कमी लोकांनाच येते म्हणून प्रेम जरा आवघड असते व प्रेम हे सहज कधी भेटत नाही.
प्रेमात अडचणी खूप असतात व शत्रू ही खूप असतात,
काहींना आपले पटत नाही व आपल्याला काहींचे पटत नाही, यातच अडकलेले असते प्रेम.
रोज आपण तिच्याकडे बघता बघता एक दिवस अचानक ती आपल्याकडे बघते, हळू हळू आपल्यालाच जास्तच आवडायला लागते, व आपण जरी
माघार घेत असलो तरी मित्र असतात, तू जा आम्ही आहे म्हणणारे. मित्र सोबत म्हणल्यावर आपण कधी मागे हटणार मंग रोजच तिचा घरा पर्यंत जाणे.
व तिनेही आपल्याला भावाला सांगेल अशी धमकी देणे पण अजूनच तिचा स्वभाव आवडल्या वर तिची ती आठवण. मंग आली तिच्या मैत्रिणीशी भेट जरा खर्च करून मनातले त्यांना सांगणे, ५ मिन बोलायचे आहे फक्त म्हणून १ तास बोलणे, तिला ही आपण आवडतो असे वाटणे, आता काय एकमेकांकडे रोजच बघणे, कधीतरी खूप काही सांगणे. न भेटता ही कधीतरी खूप आठवण काढणे.
मिञामुळे धाडस करून गडबडीत प्रपोज मारणे. तिने smile देऊन आपल्या मनाला स्पर्श करून जाणे.
आता सुरू call कधी खरेदीसाठी mall,
दोंघांची नावे काढण्यासाठी असतात घराची वॉल.
नकळत कधी कधी भांडणे ही होतात मंग असते कोणाचीतरी सॉरी आणि its ओके , छोटे छोटे भांडण कधी मोठे होते समजतच नाही खरेतर प्रेम करता करता कधी इतकी जवळ आलेली व्यक्ती बोगस,फालतू, खोटारडी, आपल्याला जीव न लावणारी वाटू लागते समजतच नाही.
आणि शेवटी खर्या खुर्या प्रेमाचा शेवट, म्हणजे प्रेमाचा The End.
इतकेच असते का प्रेम जे प्रेम जास्त दिवस टिकणारच नसेल तर का करायचे प्रेम पण हवा असतो त्याचा तिचा सहवास , कोणातरी सोबत मन मोकळे बोलणे,
कोणाच्यातरी आठवणीत झुरणे, कधी तरी एकच Cold Drink दोघांनी पिने.
"प्रेम टिकवता येते पण हवे असेलतर ते ही दोघांना". खरेतर प्रेम केल्याशिवाय कळतच नाही, म्हणून प्रेम करून बघावे एकदा.
0 Comments