Ticker

6/recent/ticker-posts

प्रेमाची गोष्ट


प्रेमाची गोष्ट
प्रेम असते कधी फुलांच्या पाकळ्या मोजणारे तर कधी सुखलेली फुले जपून ठेवणारे,
प्रेम असते कधी सर्वांसमोर रागावणारे तर कधी एकट्यात हसवणारे,
प्रेम असते पंख नसतानाही उडणारे तर कधी वेड नसताना झुलणारे,
प्रेम असते न बोलताही समजणारे तर कधी बोलूनही अबोल राहणारे,
प्रेम असते आनंदी राहून उंच भरारी घेणारे तर कधी एकत्यात बसून रडवणारे,
प्रेम असते मनाला सवरणारे तर कधी भावनांना आवरणारे,
प्रेम असते अचूक उत्तरे शोधणारे तर कधी कोड्यात अडकवणारे,
प्रेम असते अस्मरणिय क्षण बनवणारे तर कधी विसरणारे,
प्रेम असते कधी गारवा देणारे तर कधी गारव्यात गरमनारे,
प्रेम असते कधी काळजी करणारे ते कधी स्वताहून त्रास देणारे,
प्रेम असते कधी स्वप्न साकारणारे तर कधी खोटे स्वप्न दाखवनारे,
प्रेम असते कधी प्रत्येक श्वासात अठवणारे तर कधी प्रत्येक श्वासाला  विसरणारे,
प्रेम असते कधी निस्वार्थी जगणारे तर कधी स्वार्थ लपवणारे,
प्रेम असते अबोल बोलणारे तर कधी शब्द अडकवनारे,
प्रेम असते तुला जपणारे तर कधी मला  लपवनारे.
 ------- आपलाच कृष्णा मेहेत्रे.
My YouTube channal link 
Pls 🙏 subscribe
https://youtu.be/OofKvkuySS8

Post a Comment

0 Comments