शिवराया असेल तुझे उपकार जरी आज आम्ही विसरलो रे,
करून मुजरा तुझ्या समोर फक्त स्वतः साठी लढतो रे,
तुझ्याच नावाचा गजर करत आम्ही आमदार मुख्यमंत्री बनलो रे,
वाट तुझी सोडून आम्ही सारे जातीवाद प्रेमी बनलो रे,
तुझ्या स्वराज्याला आम्ही कधीच
बाजूला सारून तुझ्या गडावर आम्ही कचऱ्याचे ढीग जोडले रे,
शिकवण तुझी जरी असेल या
मातीत आमच्या पण ती मातीच आम्ही विकली रे,
दिसतो तुझ्यासारखे हुबेहूब आम्ही जरी पण
तुझ्यासारखे जगणेच आम्ही विसरलो रे.
-कृष्णा मेहेत्रे
0 Comments