Ticker

6/recent/ticker-posts

जगात न्यारी आपली यारी

जिथे दिसण्यापेक्षा असणे आवडते तिथे असतेच यारी, 
जराही तडफडलो अन् डगमगलो की सावरायला असतेच यारी, 
आपण करुद्या कितीही राढा आवरायला असतेच यारी,
आपण केलेल्या भांडणात एक हात जास्त असतेच यारी,
 पूर्ण जग चंद्रावर गेले तरी मस्तीस व्यस्त असतेच यारी,
 जिथे असेल कितीही जागा कमी अगदी तिथेही फिट असतेच यारी,
 संपुद्या गाडीचे पेट्रोल कीव्हा आयुष्यातील वाट धक्का द्यायला तिथे असतेच यारी,
 कितीही असूद्या चढ उतार सोबत चढायला असतेच यारी,
 काम असूद्या सुख वा दुःखाचे आपल्या ही एक पाऊल पुढे असतेच यारी,
 जिथे गरज असते तिथे तर असते पण गरज नसतानाही मधी मधी असतेच यारी,
 आपण खचल्या वर ही वर काढायला असतेच यारी,
 खरेतर आपल्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरणे काम असतेच यारी,
 असे एकही नाते नाही की तिथे यारी फिट होत नाही अन् 
कितीही असूद्या ओ मित्र आपल्या हृदयातील मैत्रीचा हॉल कधी
 टाईट होत नाही. कारण साऱ्या जगात देखील न्यारी फक्त आपली यारी.
 लेखक -- आपलाच कृष्णा मेहेत्रे.

Post a Comment

0 Comments